Ad will apear here
Next
मोडी लिपी शिकायचीय? कोल्हापुरात मोफत प्रशिक्षण कार्यशाळा
कोल्हापूर : मोडी लिपी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ३० डिसेंबर २०१९ ते पाच जानेवारी २०२० या कालावधीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मोडी लिपीचे मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्यामार्फत मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

शिवपूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यकाळापर्यंत प्रशासनात, तसेच दैनंदिन कामकाजासाठी मराठी भाषेबरोबरच मोडी लिपीचा प्रमुख वापर होत असल्याने त्या काळाचा इतिहास अभ्यासण्यासाठी ही लिपी ज्ञात असल्याशिवाय संशोधन होऊच शकत नाही. तसेच या काळातील कोणत्याही प्रशासकीय नोंदीच्या अभ्यासाकरिता ही लिपी ज्ञात असणे अपरिहार्य आहे.

समकालीन सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांपुढे नोकरीच्या संधीचा अभाव ही मोठी समस्या आहे; मात्र या विद्यार्थ्यांकडे एखादे कौशल्य असेल तर ते या समस्येवर सहजपणे मात करू शकतील. १९६०पूर्वीच्या शेतीसंबंधीच्या नोंदी, जन्म-मृत्यू नोंदी, खरेदीपत्रे तसेच या काळातील न्यायालयीन दावे यासंबंधीची सर्व कागदपत्रे मोडी लिपीतच उपलब्ध आहेत. मोडी लिपीचे ज्ञान असणारी व्यक्ती अशा कागदपत्रांचे लिप्यंतर करून समाजास आपले योगदान देऊन आपल्या उपजिविकेचा प्रश्नही सोडवू शकते.

मोडी लिपी ज्ञानाचा सर्वाधिक फायदा इतिहास व तत्सम सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. शिवपूर्व काळापासून इंग्रजी सत्तेच्या कालखंडातील महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्राबाबत कोणत्याही विषयावर संशोधन करावयाचे असेल, तर मोडी लिपीचे ज्ञान असल्याशिवाय पर्याय नाही.

ही काळाची गरज लक्षात घेऊन ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मच्छिंद्र चौधरी (मोडी पंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) आणि डॉ. नीलांबरी जगताप (छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे.

या कार्यशाळेला विनामूल्य प्रवेश आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनी, संशोधक, इतिहास अभ्यासक, इतिहासप्रेमी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप यांनी केले आहे.

संपर्क :
समन्वयक, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
फोन : (०२३१) २६०९४२७

इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
फोन : (०२३१) २६०९२००
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZGHCH
Similar Posts
डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यामुळे तळागाळातील विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यामुळेच तळागाळातील, बहुजन समाजातील मुलांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात स्थान लाभले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांनी काढले. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन योजना आणि डॉ. अप्पासाहेब
सरोजिनी बाबर यांच्याकडून बहुजन स्त्रीला आत्मभान देण्याचे कार्य : डॉ. राजन गवस कोल्हापूर : ‘स्वकर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्वातून बहुजन स्त्रीला आत्मभान प्रदान करण्याचे कार्य डॉ. सरोजिनी बाबर यांनी केले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी सात जानेवारी २०२० रोजी कोल्हापुरात काढले. शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्र व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन
प्रतिसरकार संकल्पना आजच्या तरुणांनी समजून घेण्याची गरज कोल्हापूर : ‘क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व नागनाथअण्णा नायकवडी यांनी प्रतिसरकार स्थापन करून जनतेला न्याय दिला. महिलांना सन्मान दिला पाहिजे, सावकारी पाश समूळ नष्ट केले पाहिजेत म्हणून ग्रामसभा, तसेच स्वतंत्र न्यायसंकुल स्थापन केले. कमी खर्चात लग्न करण्यासाठी गांधी विवाह नावाची चळवळ उभी केली होती. एकूणच
मिशिगन विद्यापीठातील डॉ. स्टुअर्ट गॉर्डन शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात रिसर्च प्रोफेसर म्हणून रुजू कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये नव्याने सुरू झालेल्या रिसर्च प्रोफेसर योजनेअंतर्गत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक स्टुअर्ट गॉर्डन यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतेच ते रुजू झाले असून, मे २०२०पर्यंत ते कार्यरत राहतील.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language